क्रिप्टो करेंसी म्हणजे काय? What is Cryptocurrency?

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय?What is Cryptocurrency?

क्रिप्टो करेंसी ही एक प्रकारची डिजिटल करन्सी आहे.ही  करन्सी चलनांचे व्यवहार करण्यासाठी बँकांशी संलग्न नसते या करन्सी चे व्यवहार हे फक्त डिजिटल केले जातात क्रिप्टो करन्सी ची फक्त ऑनलाईन विक्री आणि खरेदी केली जाते त्याचा बँकिंग व्यवहाराशी कोणता प्रकारचा संबंध राहत नाही ह्या करन्सी चा संबंध ऑनलाईन असलेल्या इंटरनेटवरून मॅनेज होणार्या डिजिटल डेटाबेस मध्ये असतो. ज्यावेळी तुम्ही क्रिप्टो  करन्सी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला डिजिटल पाठवता त्यावेळी या क्रिप्टो करन्सी ची नोंद डिजिटल पद्धतीनेच होते.

क्रिप्टो करेंसी हे एक डिजिटल चलन आहे जे की इन्क्रिप्शन अलगोरिदम ने बनवलेले आभासी चलन आहे आभासी चलन पेमेंटची पर्यायी स्वरूप आहे.डिजिटल बाजारात अनेक प्रकारच्या क्रिप्टो करेंसी आहेत आहे ते म्हणजे बिटकॉइन,डॉट कॉइन,लाईट कॉइन,इथेरियम यांसारख्या लोकप्रिय कॉइंस चे नाव तुम्ही आज कालच्या जगात ऐकले असेलच अलीकडच्या काळात क्रिप्टो करेंसी हे ऑनलाईन पेमेंट साठी एक अतिशय लोकप्रिय पर्याय बनले आहे.

सर्वात पहिली क्रिप्टो करेंसी कोणती? Which one is the first Cryptocurrency?

ऑनलाईन जगातील सर्वात पहिली क्रिप्टो करन्सी ही बिटकॉइन होती ही बिटकॉइन 2009 मध्ये अस्तित्वात आली आणि ही बिटकॉइन करन्सी आज सर्वात लोकप्रिय अशी ठरली आहे क्रिप्टो करेंसी चे मुख्य धोरण हे कॉइन नफ्यासाठी खरेदी विक्री करणे आहे.

Bitcoin.org या संख्येत स्थळाची नोंदणी 2008 मध्ये झाली हे मुखपृष्ठ जगातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या बिटकॉइनचे आहे.त्यानंतर ऑक्टोबर 2008 मध्ये साताशी नाकामोटो या व्यक्तीने इलेक्ट्रॉनिक सिस्टीम नावाचा एक पेपर प्रकाशित केला हा पेपर म्हणजे क्रिप्टो करेन्सी जगातील क्रिप्टो चे श्वेतपत्र होय.या पेपरमध्ये क्रीप्टो करेंसी ही ब्लॉकचेन कशाप्रकारे सुरक्षित आहे ह्याची आधारभूत मांडणी करण्यात आली होती.या पेपरमध्ये बिटकॉइनचे वर्णन हे एक मुक्त करन्सी म्हणून करण्यात आले होते याचा अर्थ असा की बिटकॉइनचा वापर हा ह्या जगातील कोणताही व्यक्ती करू शकतो त्या व्यक्तीला क्रिप्टो करन्सीच्या वापराबद्दल कोणतेही प्रकारचे बंधन घातले जाणार नाही,अशातच साल 2009 मध्ये बिटकॉइनच्या मायनिंग करिता सुरुवात झाली त्यासाठी बिटकॉइनचे सॉफ्टवेअर लोकांसाठी उपलब्ध करण्यात आले सातोशी नाकामोटो या व्यक्तीने पहिल्या पन्नास बिटकॉइनचे मायनिंग केले वर्ष 2010 मधे बिटकॉइनला कोणतेही वास्तविक मूल्य दिले गेले नव्हते, त्या वेळेचा डेव्हलपर गेम ऍड्रेसेन याने दहा हजार बिटकॉइन पन्नास डॉलर मध्ये विकत घेतले आणि बिटकॉइन नल नावाची वेबसाईट तयार केली त्यांनी त्याच्याकडील सर्व बिटकॉइन फक्त मौज मजा करण्यासाठी लोकांना दान करून टाकले बिटकॉइन हळूहळू मार्केटमध्ये जोर पकडत होती. त्यामुळे अनेक डेव्हलपर्सने त्यांच्या स्वतःच्या करन्सी लॉन्च केल्या हे सर्व कॉइंस बिटकॉइनला पर्याय असल्याने त्या सर्वांना या Altcoin या नावाने ओळखले जाऊ लागले त्यापैकी लाईट कॉइन हे पहिल्या Altcoin पैकी एक होते पुढच्या काळात 2013 मध्ये एक बिटकॉइन ची किंमत तब्बल 1 हजार डॉलर्स पर्यंत जाऊन पोहोचली त्यानंतर सर्वांचे डोळे बिटकॉइनवर केंद्रित झाले.बिटकॉइनची प्राईज वाढल्याने सर्व लोकांना बिटकॉइंन ची ताकद लक्षात आली. त्यामुळे बिटकॉइन हे सर्व जगात प्रसिद्धीच झोतात आले त्यामुळे क्रिप्टो चे मार्केट हळूहळू वाढले.

●इथेरियम काय आहे? What is Etherium?

इथेरियम हे 2015 लॉंच करण्यात आले या इथे रीयमने एक असे तंत्रज्ञान विकसित केले जे क्रिप्टो फंडाला सॉफ्टवेअर प्रोग्रॅम चे नेतृत्व करण्यास देत होते. इथेरीयम हे एक असे ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म आहे जे की पियर टू पियर नेटवर्क स्थापन करते आणि सुरक्षित रित्या एप्लीकेशन कोडची अंमलबजावणी करते.यालाच स्मार्ट कॉन्ट्रॅक्ट असे देखील म्हटले जाते हे ब्लॉकचेन प्लॅटफॉर्म क्रिप्टो बायर्स आणि सेलर्सला वैयक्तिकरित्या व्यवहार करण्याची परवानगी देते. या व्यवहाराच्या नोंदी या सुरक्षितपणे इंटरनेटवरील डेटाबेस वर ठेवल्या जातात त्यामुळे ह्या ब्लॉगचेन सिस्टीमवर लोकांचा विश्वास होत होता.या इथेरीयम खात्यांमध्ये केलेल्या व्यवहारांवर ऑनलाईन पद्धतीने स्वाक्षरी करणे महत्त्वाचे असते. इथेरीयम वर व्यवहार करण्यासाठी काही चार्ज आकारले जातात त्यासाठी इथेरियमचे कॉइन खर्च करणे आवश्यक आहेत. सार्वजनिक रित्या उपलब्ध असलेल्या ट्रेडिंग प्लॅटफॉर्मची संख्या आणि बिटकॉइन ची संख्या ही हळूहळू वाढत होती त्यामुळे क्रिप्टो करेंसी खरेदी करणे आणि विक्री करणे सोपे झाले या क्रिप्टोच्या तंत्रज्ञानाने लोकांना नफ्याचे आश्वासन दिले 2018 ला क्रिप्टो करन्सी चे एकूण भांडवल जवळपास 800 डॉलर्स हून अधिक वेगाने वाढलेले आपणास दिसून येते.

      आताच्या काळात क्रिप्टो करेंसी हे ब्लोकचेन तंत्रज्ञानाचा वापर करून उपयुक्त अशा नवीन सेवा देत आहे. क्रिप्टो मधील गुंतवणूकदार स्वतःचा स्टार्टअप सुरू करत आहेत क्रिप्टो करन्सी विकत घेऊन काही काळ ठेवण्यापेक्षा रोजच्या रोज क्रिप्टो करेंसी विकत घेऊन त्याला विकून आपले प्रॉफिट बुक करत आहेत. त्याचप्रमाणे आजकाल मार्केटमध्ये ब्लॉकचेन नसलेली क्रिप्टो करन्सी सुद्धा एक्सचेंज वर लिस्ट होताना आपल्याला दिसत आहे.काही क्रिप्टो करेन्सी मध्ये लोक जुगार लावतात ही पैसे कमावण्याची टेक्निक तुमचे पैसे देखील बुडवू शकते. गेल्या दशकामध्ये या क्रिप्टो करेंसी चे जाळ संपूर्ण विश्वामध्ये पसरलेले आहे.असे आपणास दिसून येते क्रिप्टो करेन्सी चे मार्केट कॅपिटल किती आहे आपण जर बघायला गेलो तर जागतिक स्तरावर क्रीप्टो करन्सी चे मार्केट कॅपिटलायझेशन हे जवळपास 2.34 ट्रिलियन आहे आणि सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात महाग असलेल्या बिटकॉइनचे मार्केट कॅपिटल जवळपास 1.19 ट्रिलियन आहे, जे सर्व बिटकॉइनच्या सुमारे 50.56% एवढे आहे जे की खूप जास्त आहे.

●क्रिप्टो करेन्सी मध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करावी? How to invest in cryptocurrency?

क्रीप्टो करन्सी मध्ये इन्व्हेस्ट करावयाचे असल्यास तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या प्लेस्टोर वर जाऊन Wazir x,Binance,Coindcx ह्यासारखे क्रिप्टो करेंसी ट्रेडिंग ॲप डाऊनलोड करून घ्या.त्यामध्ये स्वतःच अकाउंट ओपन करणे गरजेचे आहे हे क्रिप्टो करेन्सी इन्व्हेस्टमेंट ॲप तुम्ही प्ले स्टोर वर सर्च करून मिळवू शकता. त्या ॲपमध्ये तुमचा मोबाईल नंबर ईमेल टाकून रजिस्टर करा त्यानंतर तुमच्या मेलवर आणि मोबाईल नंबर वर आलेला ओटीपी ॲप मध्ये एंटर करा आता तुमचं खात सक्सेसफुल लॉगिन झालेल असेल. त्यानंतर प्रोफाइल सेक्शन मध्ये जाऊन तुमचे नाव जन्मतारीख तुमचा जेंडर सिलेक्ट करून तुमची प्रोफाइल ॲक्टिव्ह करून घ्या तुमचे क्रिप्टो करेंसी ट्रेडिंग वॉलेट ऍक्टिव्ह करून घ्या. यानंतर तुमचा बँक अकाउंट जॉईन करा ,जेणेकरून तुम्ही या वॉलेटमध्ये पैसे ऍड करू शकता एकदा का तुमच्या अकाउंट सेटअप ट्रेडिंग अकाउंट वर झाले की तुम्ही तुमच्या बँक अकाउंट वरून ह्या ॲपमध्ये पैसे ऍड करून क्रिप्टो करन्सी विकत घेऊ शकता.आणि भाव वाढले की विकू शकता.

क्रिप्टो करन्सी मध्ये इन्वेस्टमेंट करण्याचे फायदे? What is the Advantages for invest in cryptocurrency?

क्रिप्टो करेंसी मध्ये चांगल्या परताव्यासाठी गुंतवणूक करणे फायदेशीर ठरते नुकसान कमी होण्यासाठी क्रिप्टो करेंसी मधे इन्व्हेस्टमेंट साठी योग्यरीत्या अभ्यास करणे गरजेचे आहे. गुंतवणूक करण्यासाठी योग्य अभ्यास करणे गरजेचे आहे. योग्यरीत्या अभ्यास केल्यास तुम्ही तुमचा धोका कमी करू शकता. क्रिप्टो करन्सीचा एक महत्त्वाचा फायदा हा आहे की या ट्रेडिंगमध्ये बँकेची मध्यस्थी नसते, त्यामुळे ह्यातली खरेदी आणि विक्री सुलभ रित्या होते.

क्रिप्टो करन्सी मध्ये इन्वेस्ट करणाचे तोटे कोणते? What is the Advantages for invest in cryptocurrency?

क्रिप्टो करन्सी मधे बाजार हे अत्यंत अस्थिर असते आणि कमी वेळात झालेल्या लक्षणीय चढ उतारामुळे धोक्याचे असते या चढउतारा उतारांमुळे नफा किंवा तोटा होऊ शकतो. परंतु त्यात पैसे गमावण्याची जोखीम देखील असते.हे चलन व्यवहार डिजिटल होत असल्याने सायबर हल्याचा जोखीम असते. त्यामुळे यात इन्व्हेस्टमेंट करण्याची सावधगिरी बाळगली पाहिजे व्यवहारातील चलनाची तुलना करता क्रिप्टो जगातील आभासी चलनांची संख्याही मर्यादित आहे.

Leave a Comment