ह्याच म्यूच्युअल फंड मधे झाले ₹ 1 लाखाचे तब्बल ₹ 70 लाख!

मित्रानो,जर तुम्ही ICICI Prudential Multi Asset Fund 2002 मध्ये जर ₹ 1 लाख रुपये इंवेस्ट केले असते तर त्याच एक लाखाचे आज तब्बल ₹ 70 लाख रुपये झाले असते.हा Mutual Fund 21.56% टक्के रिटर्न देत आहे.

    तर,Mutual Fund मधे गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यापूर्वी ज्या वेळी ह्या फंडाची सुरुवात झाली त्या वेळे पासून त्या फंडाचे योग्य रीतीने अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे.त्याचप्रमाणे,एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की Mutual Fund मध्ये जर आपण ठराविक काळासाठी (Short Term Investment) पैसे गुंतवले तर जो परतावा कमी असतो.परंतु ठराविक काळासाठी गुंतवणूक (Short Term Investment) च्या तुलनेने दीर्घ कालावधी (Long Term Investment) मध्ये जास्त परतावा मिळण्याची शक्यता असते.परिणामी एकूण गुंतवणुक दीर्घ कालावधी साठी (Long Term Investment) मध्ये कित्येक पटीने जास्त परतावा (Return) देतो.ह्यालाच चक्रवाढ (Compounding) असे म्हणतात.

आपण आता ICICI Prudential Multi Asset Fund बद्दल दिलेल्या परताव्याची चक्रवाढ पदधतीने झालेल्या Returns ची किमया बघू.

गुंतवणूक वर्षपरतावा (%)1 Lakh Becomes (Rs)
1 वर्ष29.741,29,830
3 वर्ष23.371,87,980
5 वर्ष21.632,66,430
10 वर्ष15.094,07,733
Inception21.5670,02,150

वरील दिलेल्या टेबल मधे तुम्ही पाहू शकता जर तुम्ही ICICI Prudential Multi Asset Fund मध्ये जर एखाद्याने ₹ 1 लाखाची investment केली असती,तर एका वर्षात त्या एक लाखाचे ₹ 1.29 लाख झाले असते.तसेच जर हीच 1 लाखाची गुंतवणूक जर 3 वर्षासाठी केली असती तर त्याच एक लाखाचे ₹ 18700 हजार झाले असते.

तसेच जर एखाद्याने Mutual Fund लॉन्च होण्याच्या वेळी म्हणजेच 31 ऑक्टोंबर 2002 रोजी एका लाखाची गुंतवणूक केली असती तर त्या व्यक्तीची गुंतवणूक तब्बल ₹ 70 लाख रुपये झाली असती.

ICICI Prudential Multi Asset Fund बद्दल थोडी अधिकची माहिती.

हा फंड 31 ऑक्टोंबर 2022 रोजी सुरू करण्यात आलेला आहे.हा फंड ओपन इंडिड योजनेवर काम करतो. हा फंड एक्विटी, डेट,आणि एक्सचेंज ट्रेडेड कमोडिटीज डेरिव्हेटीव्हज,गोल्ड इटिफची युनिट्स,सिल्वर ईटीएफ ची युनिट आर इ आय टी अश्यांमध्ये गुंतवणूक करत आहे.

ह्या फंडच्या योजनेची व्यवस्थापन मालमत्ता ही ₹ 46,800 कोटी एवढी आहे.

या योजनेतील प्रमुख समभागांमध्ये

आयसीआयसीआय बँक 4.95%

एचडीएफसी बँक 4.61%

 एनटीपीसी 4.2%

मारुती सुझुकी 3.84%

 आर आय एल RIL 3.03%

इन्फोसिस 2.46%

एसबीआय कार्ड्स 2.42%

बजाज 2.3%

 सन फार्मा 2.29%

ह्या योजनेचे फंड मॅनेजर हे पुढील प्रमाणे आहेत.

मनीष बंठीया,शंकरन नरेन, इहाब दलवाई,श्री शर्मा,गौरव चिकने आणि अखिल कक्कर हे आहेत.

नोट –

ही Information केवळ आणि केवळ फक्त तुम्हाला माहिती मिळावी या उद्देशाने आहे,गुंतवणुकी संबंधी कोणताही निर्णय घेण्यासाठी कृपया सेबी नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागारांसोबत बोलूनच निर्णय घ्या.

Leave a Comment