मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना काय आहे?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Majhi ladaki bahin yojana) ही योजना महाराष्ट्र (Maharashtra Government) शासणाने यंदाच्या अर्थसंकल्पात लागू केली. ही योजना महाराष्ट्रातील महिलांसाठी आहे.ह्या योजनेमुळे जवळपास 3.5 कोटी महिलांना फायदा होणार असल्याच बोललं जातं आहे.ह्या योजनेमध्ये महिन्याला 1500 रुपये गरजू बेरोजगार महिलांच्या खात्यात टाकल्या जाणार आहे.ज्यामुळे त्यांना आर्थिक मदत होणार आहे.ही योजना 1 जुलै 2024 पासून सम्पूर्ण महाराष्ट्रात लागू केली गेली आहे.तसेच ह्या योजनेमध्ये अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 31 ऑगस्ट 2024 पर्यंत आहे.
ह्या योजने मध्ये आधी स्त्रियांची वयोमर्यादा ही वर्ष 21 ते वर्ष 60 एवढी ठरवण्यात आली होती,परंतु नव्याने काढलेल्या GR मध्ये स्त्रियांच्या वयाची मर्यादा ही 21 ते 60 वर्षावरून 21 ते 65 वर्ष एवढी करण्यात आली आहे.ह्यामुळे अजून महिलांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल.ज्या महिला ह्या योजनेत अर्ज दाखल करतील.फक्त त्याच महिलांना त्यांच्या बँक खात्या मध्ये रुपये 1500 जमा करण्यात येतील.ह्या योजनेमध्ये सरकारने केलेल्या व्याख्या मध्ये माझी लाडकी बहीण महाराष्ट्रातील 21 ते 65 या वर्ष वयोगटातील विवाहित,विधवा,घटस्फोटित आणि निराधार महिला तसेच त्या कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला अशी केली आहे.
ह्या योजनेची पात्रता अर्जदार महिला वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत आहे.
ह्या योजनेत अपात्र कोण होऊ शकत?
– ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम/कर्मचारी म्हणून सरकारी विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवनिवृत्तीनन्तर निवृत्ती वेतन घेत आहेत.तसेच रुपये 2.50 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी,स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
-सदर लाभार्थी महिने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योएजनेद्वारे दरमहिना जर रूपये 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल तर सदर ची महिला ही अपात्र ठरेल.
ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणते कागद पत्र सादर करावे लागतील?
महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र पाहिजे जर लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेन तर त्याऐवजी त्या महिलेचे 15 वर्षांपूर्वी चे रेशन कार्ड,मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला
ह्या पैकी कोणतेही ओळखपत्र/प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल. जर एखादी महिला परराज्यात जन्मलेली असेल परंतु तिने महाराष्ट्रात राहणाऱ्या पुरुषाशी विवाह केला असेल तर अश्या बाबतीत त्यांच्या पतीचे जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाण पत्र ग्राह्य धरण्यात येईल.
तसेच सक्षम प्राधिकरी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखांचा उत्पनाचा दाखला त्यात वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपर्यंत असणे अनिवार्य आहे.तसेच पिवळे व केशरी रेशन कार्ड धारकांना उत्पनाच्या दाखला प्रमानपत्रातून सूट देण्यात आली आहे.
ह्या योजनेत अर्ज करताना महिलांना त्यांचं हमीपत्र द्यायचे आहे ते पुढीलप्रमाणे.
1) माझ्या कुटुंबातील एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखाच्या पुढे नाही.
2) माझ्या कुटुंबामध्ये कोणत्याही सदस्य कर दाता नाही.
3) मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी/कंत्राटी कामगार म्हणून सरकारी विभागामध्ये/किंवा भारत सरकार मध्ये किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाहीत किंवा निवृत्ती नंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत.
4) मी शासनाच्या इतर विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे रु.1500 पेक्षा जास्त लाभ घेतलेला नाही.
5) माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य विद्यमान खासदार किंवा माजी खासदार विद्यमान आमदार माजी आमदार राहिलेला नाही.
6) माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन बोर्ड/चे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सभासद/सदस्य नाहीत.
7) माझ्या कुटुंबातील सदस्यांची सर्व मिळुन शेतजमीन ही 5 एकर पेक्षा जास्त नाही.
मी वरील प्रमाणे घोषित करते की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल अँप वर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणिकरणानंतर माझा आधार क्रमांक,बायोमेट्रिक किंवा वन टाईम पिन (OTP) माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी काहीही हरकत नसेन.मी ही देखील सहमती देते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात.मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई-केवायसी (e-kyc) वर्णन पुरविण्यास सहमती देत आहे (टीप-हे सहमती पत्र ऑनलाइन प्रिंट मारून सही करून शासनाच्या पोर्टल वर अपलोड करायचे आहे)