रिझर्व बँकऑफ इंडिया | Reserve Bank of India

* रिझर्व बँक ऑफ इंडिया | Reserve Bank of India

– भारतीय रिझर्व बँकेची स्थापना भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर एक एप्रिल 1935 रोजी करण्यात आली.ही स्थापना भारतीय रिझर्व बँक कायदा 1934 अंतर्गत करण्यात आली होती याचे मुख्यालय तत्कालीन कोलकाता या शहरामध्ये होते.परंतु ते नंतर आताच्या मुंबई येथे हलवण्यात आले आरबीआय ही सुरुवातीला एक खाजगी संस्था होती पण भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर रिझर्व बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले बँकेचे राष्ट्रीयीकरण केल्यानंतर तिचे सर्व अधिकार हे भारत सरकारला मिळाले. रिझर्व बँक ऑफ इंडिया भारतातील सर्व बँकांचे पर्यवेक्षण करते. तसेच भारतातील चलनांचा पतपुरवठा व परकीय चलनांची व्यवस्थापन रिझर्व बँक ऑफ इंडिया करते. 1990 च्या दशकातील उदारीकरणातील आर्थिक सुधारणा करण्यासाठी ही बँक अग्रेसर ठरली आहे 1991 च्या उदारीकरणाच्या काळात रिझर्व बँक ऑफ इंडिया ला चलनात स्थिरता आणण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला होता. तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया ने परकीय गुंतवणूक वाढवण्यासाठी मोलाचे योगदान केले.रिझर्व बँक ऑफ इंडियाचे आत्ताचे मुख्यालय मुंबई येथे आहे आणि संपूर्ण भारतभर त्यांची 19 कार्यालये आहेत.आणि रिझर्व बँक ऑफ इंडियाचे सध्याचे गव्हर्नर हे शक्तिकांत दास हे आहेत.

– रिझर्व बँक ऑफ इंडियाची कामे कोण कोणती असतात?

1) भारतातील सर्व बँकांचे पर्यवेक्षण करणे.

2) पैसे, फॉरेक्स आणि सरकारी सिक्युरिटी चे नियमन रिझर्व बँक ऑफ इंडिया करते.

3) केंद्र आणि राज्यांमधील कर्जाचे व्यवस्थापन करणे.

4) भारतातील चलनाचे व्यवस्थापन करणे.

5) ग्राहक संरक्षण उपक्रमाद्वारे बँकेच्या सेवांच्या संबंधित ग्राहकांच्या तक्रारी सोडवण्याचे काम करणे.

6) नवीन चलन बाजारात आणणे.

* तसेच रिझर्व बँक ऑफ इंडियाचे अनेक वेगवेगळे विभाग आढळतात त्यातील प्रत्येक विभागाचा स्वतंत्र असा कार्यभार असतो ते आपण पुढील प्रमाणे पाहूयात.

1) आर्थिक धोरण विभाग | Department of economic research – देशाचे आर्थिक धोरण तयार करण्यासाठी देशाच्या आर्थिक निकषांचा अभ्यास करण्यासाठी हे विभाग कार्य करते.

2) डिपार्टमेंट ऑफ पेमेंट | department of payment System-

 देशात पेमेंट सिस्टीम व्यवस्थित रित्या कार्य करत आहे की नाही याची पाहणी हे विभाग करते.

3) माहिती तंत्रज्ञान विभाग | information technology-

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बँकेच्या ॲप्स आयटी रिलेटेड सिस्टीम्स ना सुरक्षा प्रदान करणे त्याचे व्यवस्थापन करणे.

4) बँकिंग नियमन विभाग | Department of Banking regulation-

बँक प्रणालीची कार्यक्षमता सुनिश्चित करण्यासाठी वाढविण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांचे नियमन हे विभाग करते.

5) चलनाचे मॅनेजमेंट | Department of currency management-

चलन व्यवस्थापन विभाग हे विभाग रोजच्या यांच्या व्यवहारातील चलनी नोटा जारी करणे आणि प्रदेशात प्रसारित करणे हे काम करते.

6) डिपार्टमेंट ऑफ मॉनिटरी पॉलिसी | Department of monetary policy –

हा विभाग देशाचे आर्थिक धोरण तयार करणे आणि देशाच्या आर्थिक वाढीसाठी प्रयत्न करणे हे कार्य करते.

* रिझर्व बँक ऑफ इंडिया भारतातील बँका आणि वित्तीय संस्थांचे नियमन कसे करते?

रिझर्व बँक ऑफ इंडिया हे वित्तीय संस्थांचे आणि बँकेचे वार्षिक ऑडिट करून पर्यवेक्षण करते. रिझर्व बँक ऑफ इंडिया ही बँकांसाठी वित्तीय संस्थांसाठी मार्गदर्शक तत्वे निर्देशित करते.

आरबीआयची प्रस्तावना काय सांगते

भारतातील चलनविषयक स्थिरता राखण्यासाठी आणि देशातील चलन व्यवस्था देशाच्या फायद्यासाठी चालवण्यासाठी नोटा जारी करणे आणि त्याचे नियमन करणे वाढत्या अर्थव्यवस्थेला आव्हान आणि सामोर जाण्यासाठी प्रयत्न करणे.

आरबीआयचे पहिले गव्हर्नर कोण होते?

सर.ऑसबर्न स्मिथ (1/4/1935 ते 30/6/1937) हे रिझर्व बँक ऑफ इंडियाचे पहिले गव्हर्नर होते त्यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर होण्यापूर्वी कॉमनवेल्थ बँक ऑफ ऑस्ट्रेलिया मध्ये 10 वर्ष काम केले तसेच बँक ऑफ न्यू साउथ वेल्स मध्ये 20 वर्षे सेवा प्रदान केली सर.ऑसबर्ण स्मिथ यांनी रिझर्व बँकेमध्ये साडेतीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच राजीनामा दिला. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात बँकेच्या कोणत्याही नोटांवर स्वाक्षरी केली नाही.

* आरबीआयचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?(2018 पासून)

शक्तिकांत दास हे रिझर्व बँकेचे 25 वे गव्हर्नर म्हणून कार्यरत आहेत ते गव्हर्नर पदावर काम करण्या अगोदर पंधराव्या वित्त आयोगाची सदस्य राहिले आहेत. शक्तिकांत दास हे तमिळनाडू केड रचे १९८० च्या दशकाचे आयएएस अधिकारी आहेत.

* रिझर्व बँक ऑफ इंडिया चा लोगो काय दर्शवतो?

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या लोगो मध्ये वाघ आणि पामचे झाड आहे वाघ आणि पाम वृक्ष हे देशाचे आर्थिक स्थिरता आणि आर्थिक प्रगती दर्शवतात.वाघ शक्ती आणि गतिशीलता दर्शवतो वाघ हा लवचिकता आणि  धैर्यशी संबंधित आहे वाघ भारतीय अर्थव्यवस्थेच्या ताकदीचे प्रतीक आहे.

पाम वृक्ष हे समृद्धी आणि विकास दर्शवते म्हणूनच वाघ आणि पाम वृक्ष असलेलारिझर्व बँक ऑफ इंडियाचा लोगो भारतीय अर्थव्यवस्थेसाठी स्थिरता सामर्थ्य वाढ आणि समृद्धीचा संदेश देतो.

रिझर्व बँक ऑफ इंडियाचे 19 कार्यालये भारतात आहेत ते पुढील प्रमाणे.

1.तिरुअनंतपुरम

2. भुवनेश्वर

3.भोपाळ

4.पटना

5.नागपूर

6.लखनऊ

7.मुंबई

8.कोची

9.कोलकत्ता

10.जम्मू

11.कानपूर

12.चेन्नई

13. दिल्ली

14.गुवाहाटी

15.हैदराबाद

16.अहमदाबाद

17.चंदीगड

18.जयपूर

19.बेंगलोर

रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या आतापर्यंतच्या गव्हर्नर ची यादी खालील प्रमाणे.

1. सर ऑस्बोर्न स्मिथ – 1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937

2. सर जेम्स ब्रेड टेलर – 1 जुलै 1937 ते 17 फेब्रुवारी 1943

3. सर सी.डी. देशमुख – 11 ऑगस्ट 1943 ते 30 जून 1949

4. सर बेनेगल रामा राव – 1 जुलै 1949 ते 14 जानेवारी 1957

5. के. जी. आंबेगावकर – 14 जानेवारी 1957 ते 28 फेब्रुवारी 1957

6. एच.व्ही.आर. अय्यंगार – 1 मार्च 1957 ते 28 फेब्रुवारी 1962

7. पी. सी. भट्टाचार्य – 1 मार्च 1962 ते 30 जून 1967

8. एल.के. झा – 1 जुलै 1967 ते 3 मे 1970

9. बी. एन. अडारकर – 4 मे 1970 ते 15 जून 1970

10. एस. जगन्नाथन – 16 जून 1970 ते 19 मे 1975

11. एन.सी. सेन गुप्ता – 19 मे 1975 ते 19 ऑगस्ट 1975

12. के.आर. पुरी – 20 ऑगस्ट 1975 ते 2 मे 1977

13. एम. नरसिंहन – 3 मे 1977 ते 30 नोव्हेंबर 1977

14. आय.जी.पटेल – 1 डिसेंबर 1977 ते 15 सप्टेंबर 1982

15. मनमोहन सिंग – 16 सप्टेंबर 1982 ते 14 जानेवारी 1985

16. अमिताभ घोष – 15 जानेवारी 1985 ते 4 फेब्रुवारी 1985

17. आर. एन. मल्होत्रा – ​​4 फेब्रुवारी 1985 ते 22 डिसेंबर 1990

18. एस. वेंकटरामन – 22 डिसेंबर 1990 ते 21 डिसेंबर 1992

19. सी. रंगराजन – 22 डिसेंबर 1992 ते 21 नोव्हेंबर 1997

20. बिमल जालान – 22 नोव्हेंबर 1997 ते 6 सप्टेंबर 2003

21. वाय.व्ही.रेड्डी – 6 सप्टेंबर 2003 ते 5 सप्टेंबर 2008

22. डी. सुब्बाराव – 5 सप्टेंबर 2008 ते 4 सप्टेंबर 2013

23. रघुराम राजन – 4 सप्टेंबर 2013 ते 4 सप्टेंबर 2016

24. उर्जित पटेल – 4 सप्टेंबर 2016 ते 11 डिसेंबर 2018

25. शक्तिकांत दास१२ डिसेंबर २०१८ ते ऑक्टोबर 2021

26. शक्तिकांता दासऑक्टोबर २०२१ ते आत्तापर्यंत

Leave a Comment