म्युच्युअल फंडाचे प्रकार कोणते आहे?

Types of mutual fund?

– मालमत्ते वर आधारित म्युच्युअल फंड

-Assets Base Mutual Fund

मालमत्ते वर आधारित म्युच्युअल फंडामध्ये रिअल इस्टेट,स्टॉक,बॉण्ड्स अश्या वर्गांमध्ये गुंतवणूक केली जाते.

1) इक्विटी फंड-Equity Fund-इक्विटी म्युच्युअल फंड मध्ये कम्पणीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली जाते ह्यामध्ये मुख्यत्वे करून,लार्ज कॅप इक्विटी फंड,Largecap equity fund हे मोठ्या कपन्यांना लक्ष करतात. तर स्मॉल कॅप फंड Small cap fund अश्या व्यवसायांतील कम्पन्यांवर लक्ष केंद्रित करतात ज्या कम्पन्यांचे  फंड लहान असतात व जे उत्पन्न वाढीसाठी नवनवीन प्रकल्प आणतात.

2) कर्ज निधी -Debt Fund – Debt फंड हे बॉण्डमध्ये गुंतवणूक करतात.हे फंड स्थिर उत्पन्न देतात.ह्यामध्ये मध्ये प्रामुख्याने सरकारी बॉण्ड फंड आणि कॉर्पोरेट बॉण्ड फंडांचा समावेश होतो.

3) मनी मार्केट फंड – Money Market Fund – मनी मार्केट फंडाची जोखीम की कमी असते.हे फंड अल्प मुदतीच्या सिक्युरिटी ज मध्ये गुंतवणूक करतात.जसे की ट्रेजरी बिल आणि कमर्शिअल पेपर्स.

4) हायब्रीड फंड – Hybrid Funds – हायब्रीड फ़ंड हे फ़ंड स्टॉक आणि बॉण्ड्स मध्ये मिश्रित गुंतवणूक करतात.

– गुंतवणूकीच्या उद्दिष्टांवर आधारावर असलेले म्युच्युअल फंड.

– Investment base Goals Mutual Fund

1) वाढ निधी – Growth Fund – हा फ़ंड प्रामुख्याने जास्त वाढ क्षमता असलेल्या कंपन्यांच्या स्टॉक मध्ये गुंतवणूक करतात.जास्त परतावा मिळन्याच्या हिशोबाने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूक दारांसाठी हा फ़ंड योग्य आहे.

2) उत्पन्न निधी – Income Funds – ह्या फंड ची गुंतवणूक ही फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी ज  किंवा डिव्हिडेंट यिल्डिंग स्टॉक मध्ये गुंतवणूक करून नियमित येणाऱ्या उत्पन्ना वर भर देतात.ज्या गुंतवणूक दारांना स्थिर उत्पन्न हवे असेल त्या गुंतवणूक दारांनी ह्या फंड मध्ये गुंतवणूक करायला हरकत नाही.

3) लिक्विड फ़ंड -Liquid Fund –  हे फंड पैस्यातील तरलता आणि सुरक्षिततेला पहिले प्राधान्य देतात.हे फंड अल्प काळासाठी देण्यात येणाऱ्या कर्जात गुंतवणूक करतात.ह्यामध्ये जोखीम कमी असते.आणि परतावा देखील जलद असतो.

4) कर बचत निधी – Tax Saving Fund –

ह्या फंडाला ELSS म्हणतात,हे फंड कलम 80C च्या अंतर्गत करातून लाभ देतात.हे फ़ंड इक्विटी मध्ये गुंतवणूक करतात.

5) आक्रमक वाढ निधी – Aggressive Growth Funds –  हे फ़ंड अत्यन्त जोखमीचे असतात ह्यात तुमचे पैसे भरपूर वाढू शकतात आणि कमी देखील होऊ शकतात.ह्या फंडात जे पैस्यांची जोखीम पत्करू शकतात त्यांनीच इन्व्हेस्ट करावे.

6) भांडवली संरक्षण निधी -Capital Protection Fund-  ह्या फंडामध्ये तुम्ही तुमची केलेली इनिशीअल गुंतवणूक ही सेफ राहून तुम्हाला गुंतवणूकिवर परतावा मिळतो.

7) फिक्स्ड मॅच्युरिटी फ़ंड – Fixed Maturity Fund –  ह्या फंडामध्ये गुंतवणूक केलेल्या पैस्यांची एक फिक्स्ड मॅच्युरिटी डेट असते तुमची इन्व्हेस्टमेंट एक ठराविक काळासाठी फिक्स्ड झालेली असते.त्याचा परतावा सुद्धा तुम्हाला मॅच्युरिटी डेट लाच मिळत असतो.

8) पेन्शन फ़ंड – Pension Fund – पेन्शन फंड हा फंड निवृत्ती फंड म्हणून देखील ओळखला जातो.सेवानिवृत्ती नन्तर आर्थिक भविष्या साठी योजना करण्यासाठी ह्या फंडामध्ये लोक गुंतवणूक करतात.

– संरचनेवर आधारित म्युच्युअल फंडस्

– Structure Base Mutual Fund

1)ओपन एडेड फंडस् -Open Ended Funds-

हे फंडस गुंतवणूक दारांना सतत युनिट्स ची खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी देतात.ह्या फंडा मध्ये गुंतवणूक आणि निर्गमन करण्यासाठी लवचिकता असते.असले फंडस हे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापरले जातात

2) क्लोज एडेड फँड्स – Closed Ended Funds-

ह्या फंडात निश्चित मॅच्युरिटी कालावधी आणि तुम्हाला मिळणाऱ्या युनिट्स ची संख्या ही मर्यादित स्वरूपाची असते.गुंतवणूक दार सुरुवातीच्या ऑफर च्या कालावधीत ह्या फंडात गुंतवणूक करू शकतात.तसेच ते स्टॉक एक्सचेंज मध्ये सुद्धा ह्या युनिट्स चा व्यापार करू शकतात. हा फ़ंड सुद्धा दीर्घकालीन गुंतवणूक दारांसाठी आदर्श फ़ंड मानला जातो.

3) अंतराल निधी – Interval Funds-

ह्या फंडामध्ये ओपन आणि क्लोज फंडाची वैशिष्ट्ये एकत्रित पणे असतात.ज्या लोकांना त्यांच्या गुंतवणूकिमध्ये लिक्विडीटी हवी आहे त्यांच्या साठी हा फ़ंड योग्य आहे.

-जोखमीवर आधारित म्युच्युअल फंडाचे प्रकार

-Types of mutual fund base on risk

हे असे फ़ंड असतात जे की जोखमीवर आधारित असतात ह्यात पैस्यांची जोखीम जास्त असते.

1) खुप कमी जोखीम निधी- Very low risk funds

हे फ़ंड्स ज्या सिक्युरिटी ज मध्ये जोखीम कमी असते अश्या फंडा मध्ये गुंतवणूक करतात.ह्या फंडामध्ये भांडवलात कमी प्रमाणात चढ उतार होत असते.

2) कमी जोखीम निधी -Low risk funds

हे फंडस सरकारी बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करतात ज्या मध्ये पैस्यांची जोखीम कमी असते अश्या ठिकाणी हे गुंतवणूक करतात.

3) मध्यम जोखीम निधी – Medium risk funds

ह्या फंडामध्ये असलेले भांडवल इक्विटी आणि कर्जत गुंतवणूक करून संतुलित केले जाते.ह्या फंडमध्ये आपले भांडवल हे मध्यम पणे वाढते.

4) उच्च जोखीम निधी – High risk funds

ह्या फंडामध्ये वाढीव जोखीम असते,तसेच जास्त परतावा देखील मिळू शकतो.जे लोक पैस्याचे जास्त जोखीम घेऊ शकतात त्यांच्या साठी हा फंड योग्य असा समजला जातो.

5) स्पेशलाईज म्युच्युअल फंड – specialized mutual fund

विशिष्ट आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ह्या फंडामध्ये गुंतवणूक केली जाते.

6) क्षेत्र निधी – sector funds

हे फ़ंड विशिष्ट अश्या क्षेत्रात गुंतवणूक करतात.गुंतवणूक दारांना अस वाटत की जे सेक्टर चांगले काम करू शकेल अश्या क्षेत्रात गुंतवणूक करतात.

7) इंडेक्स फ़ंड – Index Fund

हे फंड मार्केट इंडेक्स च्या कामगिरीवर चढतात आणि उतरतात.

8) निधीचा निधी – Funds of funds

हे फंड दुसऱ्या म्युच्युअल फंडामध्ये आपले भांडवल गुंतवणूक करतात.

9) इमर्जिंग मार्केट फ़ंड -Emerging market funds-

ह्या फंडामध्ये उच्च जोखीम आणि उच्च परतावा मिळतो हे फंडस् विकसनशील अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करतात.

10) आंतरराष्ट्रीय/विदेशी निधी – International foreign funds-

हे फंडस् इंटरनॅशनल किंवा फॉरेन फंडात गुंतवणूक करतात.म्हणजेच देशा बाहेरच्या गुंतवणूकी साठी ह्या फंडात गुंतवणूक करतात.

Leave a Comment