म्युच्युअल फंड म्हणजे काय ? What is mutual fund ?

म्युच्युअल फंड म्हणजे काय? What is mutual fund?

म्युच्युअल फंड ही एक अशी गुंतवणूक आहे जी व्यावसायिक मनी मॅनेजर द्वारा गुंतवली जाते.म्हणजे तुमचे पैसे कोण कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट (Invest) करायचे हे म्युच्युअल फंड मॅनेजर ठरवतो.हे म्युच्युअल फंड मॅनेजर एक्सचेंज वर काम करतात.आणि गुंतवणूक दारांचे (Invester) चे पैसे योग्य अश्या कम्पन्यांचे मिश्रण असलेल्या मध्ये गुंतवतात.हे फंड मॅनेजर गुंतवणूक केलेल्या कम्पन्यांचे फंड मॅनेज करतो.हे फंड मॅनेजर तुम्ही इन्व्हेस्ट केलेले पैसे चांगल्या चांगल्या कम्पनी च्या Stocks मध्ये इन्व्हेस्ट करतात.ज्या स्टॉक मध्ये जोखीम कमी असते अश्या स्टॉक मध्ये हे मॅनेजर तुमचे पैसे इन्व्हेस्ट करतात.व तुम्हाला योग्य तो परतावा देतात.एका म्युच्युअल फंडामध्ये अनेक कम्पन्यांचे शेअर्स होल्डिंग्स असतात.

त्याचप्रमाणे म्युच्युअल फंड म्हणजे काय हे आपण खालील रित्या विस्तृत पणे समजुन घेऊयात.

-म्युच्युअल फंड म्हणजे गुंतवणूक दारांच्या एकूण गुंतवणूक केलेल्या पैश्याने एकत्रित खरेदी केलेले स्टॉक होय.

-म्युच्युअल फंड हे वयक्तिक गुंतवणूक दारांना व्यवसायिक पणे प्रस्थापित केलेल्या फंड च्या पोर्टफोलिओ मध्ये प्रवेश देतात.

– म्युच्युअल फंड हे वर्षाचे शुल्क,खर्चाचे काही प्रमाणात पैसे आकारात हे एका प्रकारचे कमिशन असते हे गुंतवणूक दारांच्या एकूण परताव्याचा अत्यन्त कमी असे असते.

-म्युच्युअल फंड हा एक स्वयंचलित गुंतवणुकीचा एक प्रकार आहे जो तुमची गुंतवणूक सेफ ठेऊन तुमच्यासाठी दीर्घकालीन सम्पती निर्माण करतो.

म्युच्युअल फंडाच्या युनिट्सची संकल्पना आपण पुढील सोप्या मार्गाने समजून घेऊयात.

समजा,एक 12 चॉकलेट्स चा एक बॉक्स आहे आणि त्या चॉकलेट्स च्या बॉक्स ची किंमत ही 40 रुपये आहे.चार मित्रानी हा बॉक्स विकत घेण्याचे ठरवले परंतु त्यांच्याकडे प्रत्येकी फक्त 10 रुपये आहेत.त्या सर्वांना परंतु दुकानदार हा फक्त बॉक्स च विकतो.तर आता त्या चार मित्रांनी त्यांच्याजवळ असलेले 10,10 रुपये जमा करून असे 40 रुपया मध्ये 12 चॉकलेट्स असलेला बॉक्स विकत घेतला.तर त्यांना आता प्रत्येकी 3 चॉकलेट्स किंवा 3 युनिट्स मिळतील.आपण जर ह्याची तुलना म्युच्युअल फंडाशी केली एकूण रकमेला चॉकलेट च्या एकूण संख्येशी विभाजित करावे लागेल म्हणजे 40/12=3.33 अशी ती संख्या येईल,त्यामुळे युनिट्स ची संख्या 3 प्रति युनिट 3.33 किमती ला गुणाकार केल्यास तुम्हाला तुमची 10 रुपयांची गुंतवणूक मिळेल. ह्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक मित्र चॉकलेट्स च्या बॉक्स मध्ये असलेल्या चॉकलेट्स च्या युनिट्स चा एक प्रकारचा भाग धारक असतो.

म्युच्युअल फंडा मधून गुंतवणूक दारांना परतवा कसा मिळतो?

गुंतवणूक दारांना सामान्य पणे म्युच्युअल फंड मधून 3 प्रकारे परतावा मिळत असतो.

-लाभांश/व्याज उत्पन्न – म्युच्युअल फंड स्टॉक देत असलेलं लाभांश (Dividend) आणि त्यांच्या पोर्टफोलोईओ मध्ये ठेवलेले व्याजाचे वितरण गुंतवणूक दारांना करतात.

-म्युच्युअल फंड मॅनेजर वार्षिक डिव्हिडेंट चेक गुंतवणूक दारांना देतात किंवा त्यांना ही त्यांची झालेली इन्कम पुन्हा इन्व्हेस्ट करम्यासाठी सांगतात.

-पोर्टफोलिओ चे वितरण-जर म्युच्युअल फंडाट वाढ झालेल्या सिक्युरिटी ज ची विक्री केली तर फंडाला छान नफा मिळतो.तो नफा बहुतांश वेळी म्युच्युअल फंड मॅनेजर गुंतवणूक दारांना देखील देतात

– नफा वितरित करणे- जेव्हा फंडाच्या शेअर्स ची किंमत वाढते तेव्हा तुम्ही तुमचे म्युच्युअल फ़ंड शेअर बाजारात वाढलेल्या किमतीत विकू शकता.

Leave a Comment