मित्रानो,आज आपण जाणून घेऊयात की शेअर मार्केट म्हणजे काय,शेअर मार्केट कसे काम करते, शेअर मार्केट मध्ये कश्या प्रकारे आपण पैसे इन्व्हेस्टमेंट करून प्रॉफिट कमवू शकतो.तर मित्रानो शेअर मार्केट मध्ये तुम्ही काही कंपनीचे शेअर पैशाने विकत घेऊ शकता व त्या शेअर चा भाव वाढल्यावर ते शेअर विकू शकता तुम्ही प्रॉफिट मध्ये ते शेअर विकू शकता.शेअर चे भाव वाढण्याच कारण हे असत की जर कम्पनी ला त्यांच्या व्यवसाया मध्ये प्रॉफिट झाला तर ती कम्पनी त्या प्रॉफिट मधील काहीसा हिस्सा तुम्हाला देत असते त्यामुळे त्या शेअर ची किंमत ही वाढते.त्याच प्रमाणे जर एखाद्या कम्पणीला लॉस झाला तर त्याचा परिणाम तुम्ही घेतलेल्या शेअर्स वर सुद्धा होतो व तुम्हाला काही प्रमाणात लॉस सहन करावा लागतो.जेव्हा एखाद्या कम्पणीला त्यांचा व्यवसाय वाढविण्यासाठी पैस्यांची गरज असते त्यावेळी ती कम्पनी बाजारात IPO मार्फत पैश्याची मागणी करते.अश्या प्रकारे तुम्ही शेअर ची खरेदी विक्री करू शकता.जेव्हा तुम्ही एखाद्या कम्पणीचे शेअर्स विकत घेता त्यावेळी तुम्ही त्या कम्पणीचे भागीदार असता.
– शेअर मार्केट ची सुरुवात केव्हा वर कधी झाली?
शेअर मार्केट ची सुरुवात 400 वर्षा अगोदर झाली होतो.ह्यांची सुरुवात डच ईस्ट इंडिया कम्पनी ने केली होती.ही कम्पनी आपल्या साधनांचा ट्रेड करण्यासाठी वेगवेगळ्या देशात जात असे त्यासाठी त्यांना 1000 किलोमीटर जहाजा ने फिरावं लागत असे.त्यासाठी त्यांना भरपूर पैसे खर्च करावे लागत असत.हे पैसे एखाद्या व्यक्तीकडे असेल शक्य नव्हते.त्यामुळे त्यावेळच्या डच ईस्ट इंडिया कम्पनी ने एक ऑफर च्या माध्यमातून पैसे जमवायला सुरुवात केली ती म्हणजे अशी की या आणि
आमच्या जहाजावर पैसे लावा,आमचं जहाज ज्या पण देशात जाऊन तिथला खजिना आणेल,त्यावेळी त्या खजिन्यामधील काही हिस्सा आम्ही तुम्हाला देऊ.हा फॉर्म्युला खूप वाढीस लागला आणि लोक अश्या जहाजावर पैसा लावू लागले.
त्याच प्रमाणे स्टॉक एक्सचेंज ही एक अशी जागा आहे ज्यामध्ये लोक शेअर्स ची खरेदी आणि विक्री करतात.स्टॉक मार्केट हे 2 टाइप चे असतात एक म्हणजे प्रायमरी मार्केट आणि दुसरं म्हणजे सेकंडरी मार्केट प्रायमरी मार्केट.
√ प्रायमरी मार्केट मध्ये कम्पनी येऊन स्वतःचे शेअर्स विकते कम्पनी जर चांगली असेल तर त्यांच्या शेअर्स ची प्राईज ही चांगली ठरवली जाते आणि कम्पनी चा परफॉर्मन्स जर एवढा काही खास नसेन तर त्या कँपणीच्या शेअर्स ची प्राईज ही कमी असते.कम्पनी शेअर्स ची प्राइज ही अशी ठेवते जेणेकरून त्या प्राईज वर लोकांनी ते शेअर विकत सुद्धा घ्यायला हवेत.आपण असे समजुयात की कम्पनी चे टोटल valuation हे
50 हजार आहे तर कम्पनी एक – एक रुपया चे 50 हजार शेअर्स बाजारात आणू शकते.कम्पनी त्यांचे सर्व शेअर्स हे बाजारात विकत नाही तर जो कम्पणीचा मालक असतो तो कम्पणीच्या जास्त शेअर्स चा मालक असतो म्हणजे त्याच्याकडे कम्पणीच्या जास्त शेअर्स ची मालकी असते.कारण ज्या व्यक्तीकडे कम्पणीच्या जास्तीत जास्त शेअर्स ची मालकी असते तो व्यक्ती कम्पणीचे डिसीजन घेत असतो.
सेकंडरी मार्केट – सेकंडरी मार्केट मध्ये कम्पनी काही करू शकत नाही.सेकंडरी मार्केट मध्ये कम्पणीच्या शेअर्स ची प्राईज ही कमी जास्त होत असते.ह्यावरून मार्केट ची डिमांड आणि सप्लाय आपणास समजते.जर शेअर्स ची डिमांड हाय असेल तर शेअर्स ची प्राईज वाढलेली दिसते कारण डिमांड हाय असेल तर लोक त्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करतात.त्याचप्रमाणे जर शेअर्स ची डिमांड जर कमी असेल तर त्या शेअर्स ची किंमत ही कमी झाल्याची आपणास दिसून येते.
– भारतातील स्टॉक एक्सचेंज?
बेसिकली आपल्या भारता त दोन स्टॉक एक्सचेंज आहेत एक म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज BSE आणि दुसरे म्हणजे NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज.बोंबे स्टॉक एक्सचेंज मध्ये जवळपास 5400 कम्पन्या लिस्टेड आहेत तसेच नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये 1700 कम्पन्या लिस्टेड आहेत.
आता ह्या सर्व कँपन्यांचे शेअर्स वर जात आहेत की खाली हे पाहण्यासाठी एक मापक पद्धती सिस्टम बनवली गेली आहे ते म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी होय.
सेन्सेक्स हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये असलेल्या 30 कँपन्यांचे ट्रेंड दर्शवतो ह्या सर्व कँपन्यांचे शेअर्स हे वर जात आहेत की खाली जात आहे ह्याच एव्हरेज हा ट्रेंड सांगतो.
त्याच प्रमाणे आपल्या नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड असलेल्या कँपन्यांच्या शेअर प्राईज वर जात आहेत की खाली जात आहेत ह्याचे एव्हरेज काढण्यासाठी निफ्टी इंडेक्स आहे.हे इंडेक्स निफ्टी 50 मधील असलेल्या टॉप 50 कँपन्यांचे एव्हरेज दाखवते.
– सेबी काय आहे?
सेबी ही एक गव्हर्नमेंट रेगुलेटेड बॉडी आहे जी की कँपन्यांना NSE आणि BSE वर लिस्टेड होण्यास परवानगी देते.NSE किंवा BSE वर कम्पनी लिस्ट करण्यासाठी ह्या कँपन्यांना सेबी च्या नियमावलीतून जावे लागते.कम्पनी एक्सचेंज वर लिस्ट करण्यासाठी सेबी ची नियम खूप कडक असतात.सेबी वर कम्पनी रजिस्टर करण्यासाठी भरपूर मोठी प्रोसेस आहे.कंपन्यांना ही प्रोसेस पूर्ण करण्यासाठी सुमारे 2 ते 3 वर्ष सुद्धा लागू शकतात.तुमची कम्पनी एक्सचेंज वर लिस्ट झाली त्यांनतर जर तुमचे स्टॉक मार्केट मध्ये विकल्या गेले नाहीत तर,सेबी तुमच्या कम्पणीला मार्केट मधून डिलि स्टेड सुद्धा करू शकते.
स्टॉक मार्केट मध्ये पैसे इन्वेस्ट कसे करावे?
ज्यावेळी भारतामध्ये इंटरनेट ची सुरुवात झालेली नव्हती त्यावेळी BSE एक्सचेंज च्या बिल्डींम्ग मध्ये जाऊन शेअर्स विकत घ्यावे लागत असत.परंतु आता च्या काळात इंटरनेट मुळे तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये असलेल्या ट्रेडिंग अँप वरून शेअर्स ची खरेदी व विक्री करू शकता. ह्या ऍप्स तुमच्या व कम्पणीच्या मध्ये शेअर ब्रोकर म्हणून काम करत असतात.अलीकड च्या काळात भरपूर स्टॉक मार्केट ब्रोकिंग साठी अँप मार्केट मध्ये आल्या आहेत.ह्या अँप वर तुम्हाला तुमचे डिमॅट अकाउंट ओपन करावे लागते.हे डिमॅट अकाऊंट तुमच्या बँक खात्याशी संलग्न असते.
तुमच्या बँकेत असलेले पैसे तुम्हाला डिमॅट अकाउंट मध्ये ऍड करावे लागतात.त्यांनतर तुम्ही ह्या पैश्याने एखाद्या कम्पणीचे शेअर्स विकत घेऊ शकता.